आमच्या विषयी थोडेसे…

वसुधा प्रकाशन, नाशिक विषयी माहिती
वसुधा प्रकाशन, नाशिक चे बोधचिन्ह

वसुधा प्रकाशन, नाशिक

वसुधा प्रकाशन, नाशिकची स्थापना १९८९-९० साली झाली. सुरवातीस कथा, कादंबऱ्या, कविता यापासून वसुधा प्रकाशन,नाशिकने प्रकाशनास सुरवात केली. परंतु प्रत्येक क्षेत्रात आधी स्थिरस्थावर होणे आवश्यक असल्याने विविध विषयांवरील पुस्तकांचा मार्ग स्वीकारण्यात आला. सद्यस्थितीत वसुधा प्रकाशनाने आता विविध विषयांवरील पुस्तके हाताळण्यात प्रयत्न सुरू केला आहे. नुकतेच वसुधा प्रकाशनाने साने गुरुजींचे श्यामची आई हे पुस्तक त्याचा दर्जा अबाधित राखून प्रकाशित केले आहे. तसेच साने गुरुजींचे भारतीय संस्कृतीसुंदर पत्रे ही वाजवी किंमतीत प्रकाशित करण्याचा प्रकाशनाचा मानस आहे. भावी काळात वेगवेगळे प्रयोग करण्याच्या दृष्टिकोनातून प्रकाशनाची वाटचाल सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे मान्यवर लेखकांच्या कांदबऱ्या प्रकाशित करण्याच्या दृष्टीकोनातून वसुधा प्रकाशनाने प्रयत्न सुरू केला आहे...

वसुधा प्रकाशन, नाशिकचे संचालक श्री. विलासराव गायकवाड हे पदव्युत्तर आहेत. ते सरकारी नोकरीत होते. परंतु स्वत:ची इच्छाशक्ती व या व्यवसायाची आवड यामुळे त्यांनी या व्यवसायात प्रवेश केला. गेल्या २३ वर्षात त्यांनी जीवनउपयोगी व विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी पुस्तके प्रकाशित करण्याकडे त्यांचा केला आहे. प्रत्येक पुस्तकाची एक वेगळीच शैली असते. त्या पुस्तकांना ललित, अथवा व्यावसायिक पुस्तके असा निकष सध्याच्या कालात लावून चालत नाही अशी संचालकांची धारणा आहे. वेगळ्या शैलीची अनुवादित, मान्यवर लेखकांच्या उत्तमोत्तम कादंबऱ्या असे बरेच उपक्रम राबवण्याचा संचालकांचा प्रयत्न आहे.

आमचे लोकप्रिय लेखक

आमच्या लोकप्रिय लेखकांबद्दल माहिती

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी

M.Com., M.Phil., D.B.M., D.I.T., Ph.D.

डॉ. प्रकाश वेरेकर

M.D. (Alt. Med.), Ph.D. (Ayu.) Doctor of Acupuncture (Canada), International License of Acupuncture (WHO SYLLABUS)

सचिन जोशी

B.Com, M.P.M., L.L.B., D.T.L., D.L.L.& L.W, G.D.C & A., M.A.(Education in Communication)

श्री. मधुकर सुखात्मे

निवृत्त कार्यकारी अभियंता (पाटबंधारे विभाग)

स्व. मधुकर गो. अत्रे

B. A. (पुणे विद्यापीठ)