डॉ. राम कुलकर्णी यांच्या विषयी थोडेसे…

डॉ. राम कुलकर्णी यांचे अल्प चरित्र
डॉ. राम कुलकर्णी

डॉ. राम कुलकर्णी

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी हे एज्युकेशन सोसायटीमधील नामवंत प्राचार्य आहेत. व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर त्यांची आतापर्यंत ५० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यातील अनेक पुस्तकांच्या ५ ते ६ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. तज्ञ व्याख्याता म्हणून विविध ठिकाणी व्याख्याने व शिबीरे यांचे आयोजन. त्यांना वाणिज्य विषयात पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून पुणे विद्यापीठाची मान्यता मिळालेली आहे. तसेच वाणिज्य व व्यवस्थापन या विषयात पीएच.डी मार्गदर्शक म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाची मान्यता मिळालेली आहे. सध्या त्यांचे मार्गदर्शनाखाली आठ विद्यार्थी पीएच.डी. संशोधन करीत आहेत.