श्री. मधुकर गो. अत्रे हे अत्यंत मृदू स्वभावाचे होते. ते १९८२ साली महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन येथून निवृत्त झाले. ज्योतिर्विद्येचे अत्यंत गाढे अभ्यासक असलेल्या स्व. मधुकर गो. अत्रे यांनी अनेक ज्योतिषविषयक व धार्मिक पुस्तके लिहिली. ज्योतिर्विद्येमध्ये त्यांनी अनेक पदव्या मिळविल्या होत्या. नाशिक ज्योतिर्विद्या संशोधन मंडळाचे ते संस्थापक सदस्य होते.