चटपटीत हे पाककृती या विषयाला समर्पित त्रैमासिक आहे. १९९५ साली दिवाळीमध्ये ते वार्षिक स्वरूपात प्रसिद्ध झाले. २००८ पासून चटपटीत वार्षिकाचे रंगरूप बदलून त्याला त्रैमासिक करण्यात आले. तीन विशेषांकासह एक दिवाळी अंक असे वर्षात एकूण चार चटपटीतचे अंक प्रसिद्ध केळे जातात. नाशिकसारख्या प्रादेशिक भागातून गेली पंधरा-सोळा वर्षे चटपटीत व सौंदर्यस्पर्श हे दोन अंक खंड न पडता सातत्याने प्रकाशित होत आहेत. चटपटीत हे त्रैमासिक फक्त गृहिणीच्या विषयालाच वाहिलेले आहे. स्पेशल रसोई, स्पेशल पाककृती विषयक अंक असे या त्रैमासिकाचे स्वरूप आहे.