व्यक्तिमत्त्व विकासावरची आजवर अनेक पुस्तके पाहिलीत परंतु आजच्या गृहिणी, महिला, नोकरदार स्त्रिया, तरुणी, उद्योजिका इत्यादी सर्व भूमिका यशस्वीपणे पार पाडणाऱ्या महिलांसाठी व्यक्तिमत्त्व विकासाचे पुस्तक प्रथमच लिहिले गेले आहे. व्यक्तिमत्त्व विकासाचे सोपे मार्ग, व्यक्तिमत्त्व विकासातील अडचणी आणि त्यावरचे उपाय... महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात येणारे अडथळे अशा अनेक प्रश्नांचा या पुस्तकात विचार करून प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांनी सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे.