शिक्षणतज्ञ श्री सचिन जोशी सरांनी लिहिलेले मैत्री अभ्यासाशी? हे पुस्तक खरं तर आहे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, त्यांचा सोबती. विद्यार्थ्यांना अभ्यास करताना प्रश्न पडत असतात त्याच्या नियोजनाचे, वेळेच्या व्यवस्थापनाचे, एकाग्रतेचे, परीक्षा तंत्राचे, परीक्षेच्या भीतीचे... या सर्वांची उत्तरे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळतात यातील पाना-पानात. या पुस्तकाचे वाचन देते प्रत्येक विद्यार्थ्याला आत्मविश्वास आणि यशाची खात्री. म्हणूनच हवं आहे हे पुस्तक त्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे ज्याला गाठायचं आहे यशाचं शिखर. आणि त्या प्रत्येक घरात ज्यातील पालकांना घडवायचं आहे आपल्या पाल्याला, त्याच्या भविष्याला... आजवर एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी अनुभवलेली अभ्यासाची मार्गदर्शक तत्त्वे !