श्यामची आई

साने गुरुजी
श्यामची आई (मुख्यपृष्ठ) श्यामची आई (मलपृष्ठ)

श्यामची आई

लेखक

साने गुरुजी

पृष्ठसंख्या: २२४ मूल्य: ₹१६०.००

श्यामची आई म्हणजे साने गुरुजींच्या आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करुण व गोड कथात्मक चित्र. साने गुरुजी नाशिकच्या तुरुंगात असताना त्यांनी हे पुस्तक लिहिले. मातृप्रेमाचे हे महन्मंगल स्तोत्र महाराष्ट्रात घरोघरी पोचले आहे. पिढ्यान्‌पिढ्या वाचले जाणारे व महाराष्ट्राचा जीव की प्राण असलेले हे पुस्तक शंभराच्यावर मुद्रणानंतर स्वामीत्वमुक्त झाले आहे. श्यामची आई या पुस्तकाचे मुद्रण करता आले हा आम्ही आमच्या प्रकाशनाचा बहुमान समजत आहोत. या पुस्तकात प्रसंगानुरूप पूर्ण पानाची चित्रे टाकण्यात आली आहेत. श्यामची आई या पुस्तकाने आबालवृद्धांच्या मनात अत्यंत मानाचे स्थान मिळविलेले आहे. साने गुरूजींचा हा सांस्कृतिक वसा पुस्तकाचा मूळ दर्जा कायम राखून महाराष्ट्रात दूरवर पोचावा असा वसुधा प्रकाशनाचा प्रयत्न आहे.