कर्मयोगी राजा रविराजा, रजनीनाथ चंद्र, भूमिपुत्र मंगळ, नवग्रह शिरोमणी युवराज बुध, देवानाम् च ऋषिणाम् च गुरू, सौंदर्याची देवता शुक्र, धर्मात्मा शनी, छाया बिंदू राहू-केतू या नवग्रहांचे कर्म, ग्रह धर्म, युती योग, आयुष्यावर होणारा त्यांचा परिणाम, ग्रह राशी, नक्षत्र, नवांश राशी यांचे स्वामी यांच्या मैत्री योगाचे परिणाम... शुक्र व वैवाहिक जोडीदार, गुरू करावयाचा अधिकार, ग्रहांची खरी ओळख इत्यादींबाबत सखोल माहिती व उपासनेसह... नवग्रहांच्या सखोल माहिती व उपासनेसह एक अत्यंत अभ्यासात्मक पुस्तक!