मऱ्हाटमोळी शाकाहारी रसोई. यात चटण्या-कोशिंबीरी, लोणची, भाताचे प्रकार, आमट्या, सार, कढी इ., भाज्या, पोळी, भाकरी इ., गोडाचे पदार्थ, मधळी वेळ किंवा उपाहार, पुडिंग्ज, बेकिंग, अशा दहा विविध विभागात सामावलेली कुटुंबातील मंडळींना रूचेल, पटेल असा रूचिपालट घडवून आणण्यासाठी सात्विक व पौष्टिक आहाराची साध्या व सौम्य पाककृती, काही संस्थानी, सरंजामी, रूचकर अशा शाकाहारी पाककृतींनी ही रसोई सजलेली आहे.