मित्रांमधील गुंतवणूक हीच सर्वोत्तम गुंतवणूक. सहिष्णूता वाढवा, विसंबून राहू नका, पझेसिव्ह बनू का, मित्रांच्या विचारांचे मूल्यमापन करू नका... मित्रांच्या महत्त्वाकांक्षा जाणून घ्या. त्यांच्यात सकारात्मक बदल करा... निंदानालस्ती करू नका, अनाहूत सल्ला देऊ नका, चांगल्या गुणांची प्रशंसा करा.. अशा अनेकविध पैलूंवर सखोल प्रकाश टाकून मित्र कसे जोडावे? मित्रत्वाची कला जोपासावी याचे बहुमोल मार्गदर्शन करणारे पुस्तक...