दगलबाज शिवाजी

प्रबोधनकार ठाकरे
दगलबाज शिवाजी (मुख्यपृष्ठ) दगलबाज शिवाजी (मलपृष्ठ)

दगलबाज शिवाजी

लेखक

प्रबोधनकार ठाकरे

पृष्ठसंख्या: ३२ मूल्य: ₹५०.००

बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजी या तुलनेत विचारांचे ब्रह्मांड आहे. भारतीय समरभूमीवरीलळ अर्जुन आणि प्रतापगडावर अफझुलखानापुढे उभा ठाकलेला शिवाजी, यांची तुलना केली तर अर्जुनापेक्षा शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो. काका, मामा, आप्पा, बाबा यांना कसे मारू या क्षुद्र कल्पनेला बळी पडून, विहित कर्तव्याला बगल मारून पळू पाहणारा बगलबाज अर्जुन पहा आणि भेटीचे ढोंग करून दगा देण्यास आलेल्या दगलबाज अफझुलखानाला त्याच्याच युक्तीने गारद करणारा कर्तव्यतत्पर सवाई दगलबाज शिवाजी पहा, म्हणजे कर्तव्याकर्तव्याचे कोडे थोडे तरी सुटेल. अफझुलखान ठार मारल्याशिवाय; त्या मुकाबल्याचा निर्णय लागणारा नव्हता. अर्थात, शिवाजी मारीन किंवा मरीन अशा अटीतटीचा सामना देण्याच्या तयारीनेच प्रतापगड चढला आणि त्याच्या अलौकिक प्रसंगावधानाने त्याने अशक्य गोष्ट शक्‍य करून दाखविली. हिंदवी स्वराज्याच्या प्राणप्रतिष्ठेसाठी स्वत:चा प्राण देणे अथवा अफझुलखानाचा प्राण घेणे, यापेक्षा तिसरा मार्गच शिवाजीपुढे नव्हता. अर्थात ते कर्तव्य त्याने मोठ्या कुशलतेने पार पाडून कर्मसुकोशलम या गीतोक्तीप्रमाणे राजकारणी दगलबाजांतील योगिराज ही आपली कीर्ती जगजाहीर केली...