साने गुरुजींनी सुधाताईस लिहिलेल्या पत्रांचा हा संग्रह आहे. ना. ग. गोऱ्यांनी त्यांच्या “कृतज्ञता पत्रात” सुधाताईंना म्हटले आहे, “सुधाताई, तू मोठी भाग्याची. तुझ्या अण्णांचा थोरल्या भावावर जसा जीव होता तसाच तुझ्यावरही. देवाघरी जातानासुद्धा त्याचा फोटो त्यांनी आपल्या उजव्या खिशात ठेवला होता गुरूजी नाना ठिकाणी हिंडत. नाना देश, नाना वेष, सृष्टीचे नाना प्रकार ते पाहात. त्यांची दृष्टी जरी सदैव भूमीकडे वळलेली दिसे, तरी त्यांच्या नजरेतून बारीकसारीक गोष्टदेखील निसटत नसे. त्यांची नजर जशी रत्नपारख्याची होती !... साने गुरुजींनी सुधाताईस लिहिलेल्या या पत्रांचा संग्रह प्रत्येक वाचकांच्या संग्रही जरूर असायला हवा. साने गुरुजींची ममता ही आजच्या पिढीला, व आबालवृद्धांना समग्र समजण्यासाठी एकदा ही सुंदर पत्रे? जरूर वाचा...